शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By वेबदुनिया|

विपरितकर्णी आसन

या आसनाच्या शेवटच्या अवस्थेत शरीर संपूर्ण उलटे होते. म्हणूनच याला विपरितकर्णी आसन असे म्हणतात.
 
कृती - या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पाय जवळजवळ घ्यावे. हातांची बोटे जमिनीवर आणि मान सरळ ठेवावी. हळू हळू दोन्ही पायांना 30 अंशात आणावे. त्यानंतर काही सेकंद थांबावे. नंतर पायांना 45 डिग्री अंशांत वाकवावे. तिथे काही क्षण थांबावे.
 
त्यानंतर पायांचा 90 अंशाचा कोन केल्यानंतर दोन्ही हात जमिनीवर ठेवून नितंब हळूहळू उंच करावे. दोन्ही हात नितंबावर ठेवावे आणि पाय सरळ करावे.
 
सूचना - 90  डिग्री अंशावर पोहचल्यानंतर पायाला झटका देऊन उचलू नये. पाय उचलताना गुडघ्यात वाकवू नये. नितंब उचलताना उजव्या व डाव्या बाजूला पाय झाल्यास मान आखडण्याची शक्यता असते. पाय नितंबाच्या रेषेत असावेत. ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, कमरेचे किंवा मानेचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करु नये.
 
फायदा - या आसनाने पोट, यकृत, किडनी, मूत्राशय आदींना चांगला व्यायाम होतो. यासंदर्भातील आजारावरही हे आसन प्रभावी आहे. रक्तशुद्धी होण्यास मदत होते.