गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (16:44 IST)

केस गळतीवर घरी बसल्या करा दोन उपाय

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर हे उपाय खास आपल्यासाठी आहे-
दररोज सकाळी 10 मिनिट पृथ्‍वी मुद्रा करा.पृथ्वी तत्वाचा थेट संबंध आमच्या केसांशी असतो म्हणून केसांच्या वाढीसाठी नियमाने पृथ्वी मुद्राचा अभ्यास करणे फायद्याचे ठरेल.
 
तथापि पृथ्वी मुद्राने ब्‍लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते म्हणून याने केस गळतीवर चांगले परिणाम दिसून येतात आणि नवीन केस येण्यास मदत होते. हे अवेळी केस पांढरे होण्यापासून देखील वाचवतं. या मुद्रामुळे ताण आणि काळजी कमी होते आणि मेंदू शांत राहतं. केसवाढीसाठी पृथ्वी मुद्रा अभ्यास एक महत्वपूर्ण उपाय आहे.
 
करण्याची विधी
अंगठ्याच्या टोकाने अनामिकेच्या टोकाला हलकेच स्पर्श करा.
उर्वरित बोटे शक्य तितक्या पसरवावे.
तुम्ही ते ध्यान किंवा प्राणायामासोबत एकत्र करू शकता.
सुरुवातीला दिवसातून दोन ते तीन वेळा चार ते पाच मिनिटे पृथ्वी मुद्राचा सराव सुरू करा.
 
तसेच दररोज 15 मिनिटे रिकाम्या पोटी बालयम अर्थात नेल रबिंग योग करा. बालयम योग रिफ्लेक्सोलॉजीच्या तत्त्वांवर कार्य करते. केसाचे रोम नखांच्या बेड्समधील मज्जातंतूंच्या टोकाशी जोडलेले असतात. म्हणून जेव्हा तुम्ही या मज्जातंतूंच्या अंतांना उत्तेजित करता तेव्हा ते तुमच्या टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांची वाढ होते.

Edited by- Priya Dixit