मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:20 IST)

दररोज योगासन केल्यानं प्रत्येक रोग होईल दूर

योगाचे फायदे : मानसिक आणि शारीरिक सुख मिळविण्यासाठी योग एकमेव असे साधन आहे. योगासनाने  केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक रोगांपासून मुक्त होण्यास मदत मिळते. आयुष्यात तोच व्यक्ती प्रगती करतो जो शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ आहे.चला तर मग अशा काही योगासनाबद्दल जाणून घेऊ या जे आजारापासून मुक्त करण्यात मदत करतात.
 
योगाचे प्रकार -
1  पश्चिमोत्तानासन-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पश्चिमोत्तानासन आसन एक वरदान आहे.दररोज सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी हे आसन केल्यानं मधुमेहासह शरीरातील रक्तदाब देखील सामान्य राहतो.हे आसन वजन कमी करण्यात,पोटाची चरबी कमी करण्यात, नैराश्य कमी करण्यात आणि पाठीचा कणा सुधारण्यासाठी देखील कार्य करतो. 
 
2 धनुरासन -
या आसनाला हे नाव त्याला त्याच्या धनुष्याच्या आकारामुळे मिळाले आहे, धनुरासन=धनुष्य+आसन. मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासह हे आसन पोटाशी निगडित समस्यांपासून बचाव करतो. हे आसन केल्यानं पाठीचा कणा लवचीक बनतो.तसेच हे आसन कुल्हे किंवा नितंब आणि खांद्यासाठी फायदेशीर आहे.
 
3 अर्ध मत्स्येंद्रासन -
अर्ध मत्स्येंद्रासन ला केल्यानं मूत्रपिंड, स्वादुपिंड,लहान आतडे आणि लिव्हरशी संबंधित आजार दूर होतात. स्नायूमध्ये वेदना,कंबरमध्ये वेदना, मान दुखणे या सर्व मध्ये अर्ध मत्स्येंद्रासन फायदेशीर आहे.
 
4 ताडासन - हे आसन करण्यासाठी आपल्या संपूर्ण शरीराला ताणणे आवश्यक आहे. मुलांसाठी ताडासन योगासन फायदेशीर आहे. वाढत्या मुलांनी दररोज उठून हे आसन करून बघावे. या मुळे त्यांची उंची चांगल्या प्रकारे आणि जलदगतीने वाढेल. ऑफिस मध्ये सतत बसून काम केल्यानं स्नायूमध्ये कडक पणा जाणवतो, आपण काही वेळ काढून हे आसन ऑफिसमध्ये देखील करू शकता.हे केल्यानं आपण ऊर्जावान अनुभवाल.   
 
5 त्रिकोणासन- 
हे उभारून केले जाणारे महत्त्वाचे आसन आहे.'त्रिकोण' म्हणजे त्रिभुज आणि आसन चा अर्थ योग आहे . या आसनामध्ये शरीराची त्रिकोणाकृती होते, म्हणून ह्याचे नाव त्रिकोणासन देण्यात आले.त्रिकोणासन योग कंबरदुखीला कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट योगासन आहे. हे लठ्ठपणा कमी करण्यासह मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात मोठी भूमिका बजावतो.
 
6 सूर्य नमस्कार-
सूर्य नमस्काराने बद्धकोष्ठता,आळस,निद्रानाश सारखे विकार दूर होतात. पचन तंत्राचे कार्य वाढते. हे आसन केल्याने शरीराच्या सर्व लहान मोठ्या नसा सक्रिय होतात. या मध्ये एकूण 12 योगासन असतात. सूर्य नमस्काराचे तिसरे आणि पाचवे आसन सर्वाइकल आणि स्लिप डिस्क च्या रुग्णांना निषिद्ध आहे. हे दररोज केल्यानं आपल्या त्वचेत वेगळीच चमक येते. जेव्हा पोट स्वच्छ होईल तेव्हाच चेहऱ्यावर चमक येईल.
 
7 हलासन - 
या आसना मध्ये शरीराचा आकार शेतात चालविणाऱ्या नांगरा प्रमाणे होतो. म्हणून या आसनाला हलासन म्हटले जाते. पचन प्रणालीला सुधारण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. हलासन पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करते.मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आसन करणे फायदेशीर आहे. हे केल्यानं मान, खांदे, पोट, पाठ आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.
 
8 भुजंगासन -
भुजंगासन केल्यानं व्यक्तीचा पाठीचा कणा बळकट होतो. हे आसन केल्यानं पचन ठीक राहतो आणि बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीचा त्रास देखील होत नाही.
 
9 शवासन -
हे आसन सर्वात शेवटी करतात. कारण शारीरिक आसन केल्यानं शरीर थकत.आणि असं होणं देखील स्वाभाविक आहे. दररोज किमान 15 मिनिटे आपण हे आसन आवर्जून करावं.आपली इच्छा असल्यास घरी आल्यावर आपण हे करू शकता. हे केल्यानं शरीराचा सर्व थकवा काही मिनिटातच दूर होईल.