शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिन निबंध

प्रस्तावना: पहिले आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 रोजी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. या दिवशी जगात कोट्यवधी लोकांनी योग केले जे की एक विश्व विक्रम असे. योग व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे ज्याचा माध्यमातून शरीराचा अवयवांवरच नव्हे तर मन, मेंदू, आणि आत्म्याचं संतुलन केलं जातं. हेच कारण आहे की योगाने शारीरिक त्रासाव्यतिरिक्त मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते.
 
योग शब्दाची उत्पत्ती : योग शब्दाची उत्पत्ती संस्कृतीच्या युज पासून झाली आहे. ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे सार्वभौमिक चेतनेशी संयोग. योग तब्बल दहा हजार वर्षांहून अधिक पूर्वीपासून अवलंब केले जात आहे. 
 
वैदिक संहितानुसार प्राचीन काळापासूनच तपस्वींबद्दल वेदांमध्ये उल्लेख केलेला आहे. सिंधू घाटी संस्कृतीमध्ये योग आणि समाधी दर्शवणाऱ्या मूर्ती सापडल्या आहेत.
 
हिंदू धर्मात ऋषी, तपस्वी आणि योगी मुनींनी योग संस्कृती अवलंबली होती. सामान्य लोकांमध्ये या विधेचा प्रसार होऊन जास्त काळ झाला नाही. तरीही या योगाचे महत्त्व समजून हे निरोगी जीवनशैलीसाठी याचे अवलंबणं केले जात आहे. याचे मुख्य कारण आहे व्यस्त, तणावपूर्ण आणि अस्वस्थ दिनचर्येवर होणारा याचा सकारात्मक परिणाम.
 
योगाचे प्रकार : योगाच्या प्रामाणिक पुस्तकांमध्ये जसे की शिवसंहिता आणि गोरक्षशतकामध्ये योगाचे 4 प्रकार सांगितले आहे.
1 मंत्रयोग : ज्यामध्ये वाचिक, मानसिक, उपांशु, आणि अणपा येतात.
2  हठयोग 
3  लययोग
4  राजयोग : या अंतर्गत ज्ञानयोग आणि कर्मयोग येतात.
 
योगाचे स्तोत्र : पतंजली हे औपचारिकरीत्या योग दर्शनाचे संस्थापक मानले गेले आहेत. 
पतंजलीचे योग बुद्धिमत्तेच्या नियंत्रणासाठी एक प्रणाली आहे. ज्याला राजयोग म्हणून ओळखलं जातं. पतंजलीच्यानुसार योगाचे 8 सूत्र सांगितले आहे. जे खालील प्रमाणे आहेत.
 
1 यम - या अंतर्गत खरं बोलणे, अहिंसा, लोभ न करणे, विषयासक्ती न होणे आणि स्वार्थी न होणे समाविष्ट आहे.
2 नियम - यामध्ये पवित्रता, समाधानी, तपश्चर्या, अभ्यास आणि देवाच्या चरणी जाणे समाविष्ट आहे.
3 आसन - यामध्ये बसण्याची आसनं समाविष्ट आहे.
4 प्राणायाम - यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे आणि रोखून ठेवणे महत्त्वाचे आहे.
5 प्रत्याहार - बाह्य वस्तू, इंद्रियांपासून प्रत्याहार.
6 धारणा - यामध्ये एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
7 ध्यान - ध्यानाच्या गोष्टींच्या प्रकृतीचे चिंतन करणे.
8 समाधी - ध्यान करणाऱ्याच्या वस्तूंचे चैतन्यासह विलिनीकरण करणे समाविष्ट आहे. 
याचे दोन प्रकार आहे सविकल्प आणि अविकल्प. अविकल्पामध्ये जगाकडे परतण्याचे मार्ग नसतात त्यामुळे ही योग पद्धतीची चरमस्थिती आहे.
 
भगवद्गीतेमधील योग : भगवद्गीतेमध्ये योगाचे तीन प्रकार सांगितले आहे. जे खालील प्रमाणे आहे.
1 कर्मयोग - या मध्ये व्यक्ती आपल्या स्थितीच्या योग्य कर्तव्यानुसार श्रद्धेनुसार कार्य करतात.
2 भक्ती योग - यामध्ये भगवद कीर्तन मुख्य आहे. भावनात्मक व्यवहार असलेल्या लोकांना हे सुचवले जातं.
3 ज्ञान योग - या मध्ये ज्ञान घेणे म्हणजे ज्ञानार्जन करणे समाविष्ट आहे.
 
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने दर वर्षी 21जून ला जागतिक योग दिन म्हणून मान्यता दिली. आणि 21 जून 2015 रोजी पहिले आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरे केले गेले.
 
प्रथमच जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तब्बल 192 देशांमध्ये योगाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये 47 मुस्लिम देश देखील समाविष्ट होते. या निमित्ताने दिल्ली मध्ये तब्बल 35985 लोकांनी योगाचे प्रदर्शन केले या मध्ये 84 देशांचे प्रतिनिधी आले होते. भारताने दोन विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस मध्ये आपले नाव नोंदवले.
 
पहिले रेकॉर्ड एकाच जागेवर सर्वात जास्त लोकांनी योग करण्याचा विश्वविक्रम बनवला आणि दुसरे एकाचवेळी सर्वात जास्त देशांमधील लोकांनी योग करण्याचा. आता योगाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आरोग्य आणि शांतीसाठी व्यापक रुपाने स्वीकारले आहेत.