मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (22:54 IST)

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या आसनांचा सराव करा

सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्यासाठी तुम्ही संपूर्ण दिवस जिममध्ये घालवणे आवश्यक नाही. सध्या सर्व जिम बंद आहेत, अशा परिस्थितीत घरी नियमितपणे काही योग करून सिक्स पॅक एब्स बनवा. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 वीरभद्रासन -शरीराला योग्य आकार आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी वीरभद्रासनाचे फायदे आहे.हे योद्ध्याचे आसन देखील म्हणवले जाते.आपल्याला सिक्सपॅक ऍब्स बनवायचे असल्यास दररोज या आसनाचा समावेश आपल्या दिनचर्येत करावा.
 
2 हलासन - जे हलासनाचा दररोज सराव करतात त्यांच्या पोटाच्या खालील भागाचे स्नायू खांदे,पाठ,आणि पाय मजबूत होतात. म्हणून दररोज याचा सराव करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकत. हलासनाचा परिणाम आपल्या मज्जा संस्थेवर देखील होतो. हार्मोन्स चे उत्सर्जन देखील हे आसन करून नियंत्रित केले जाऊ शकते.
 
3 ताडासन - या आसनाचा सराव आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे.योगासन सुरु करण्यापूर्वी आणि शेवट करताना हे आसन आवर्जून करा.हे केल्याने आपले शरीर ताणले जाते.हे केल्याने एब्स टोन होण्यास सुरु होते.म्हणून ह्याचा सराव करणे सोडू नका. हे खूप सोपे आसन आहे. हे कोणीही करू शकतो.