गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (18:06 IST)

हे योगासन महिलांनी नियमित करावे

सध्या भारतात पीसीओडी ची समस्या होणं सामान्य बाब आहे.परंतु ही समस्या अत्यंत वेदनादायक आहे.अशा परिस्थितीत योग केल्याने या समस्येमध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकेल.या साठी हे आसन नियमियतपणे करावे.
 
1 तितली किंवा फुलपाखरू आसन -स्त्रियांसाठी हे आसन करणे फायदेशीर आहे.हे आसन प्रजनन अवयवांसह पायाला आणि मांडीला बळ देण्याचे कार्य करतो.हे मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवतो.हे आसन दररोज केल्याने मासिक पाळी नियमित होते.शरीर हलकं होत.
 
2 भुजंगासन-पीसीओडी च्या समस्येमध्ये भुजंगासनाचा नियमित सराव केल्याने स्त्रियांना फायदा मिळतो.याचा सरावाने प्रजनन अवयवांना बळ मिळत.हे मासिक पाळी नियमित करतो.असं असल्यावर पीसीओडी ची समस्या दूर होते.हे आसन किडनी आणि गर्भाशयाला देखील मजबूत करत.
 
3 शशांकासन-या आसनाचा सराव केल्याने पेल्विक स्नायू बळकट होतात,तसेच प्रजनन अवयवांचे त्रास दूर करून या मुळे प्रजनन ग्रंथीमधील हार्मोन्स स्त्राव संतुलित होते आणि स्त्रियांच्या समस्या दूर होतात.