कोणत्याही जमिनीची अनुकूलता तसेच प्रतिकूलता त्या जमिनीला लागून असणार्या रस्त्यावरही अवलंबून असते. जमीन विकत घेताना त्याच्या आजूबाजूच्या रस्त्याचाही विचार करायला हवा. जमिनीच्या कसे रस्ते हवेत हे ही समजून घ्यायला हवे.
* ज्या जमिनीच्या चारही बाजूंनी रस्ते आहेत अशी जमीन सर्वोत्तम. * जमिनीच्या तिन्ही बाजूला समांतर रस्ते असणेही शुभ असते. * ज्या जमिनीच्या पश्चिम व दक्षिण दिशेला रस्ता आहे त्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहणार्या लोकांना अधिकार व धन दोन्ही प्राप्त होते. असा भूखंड व्यापारी वर्गासाठी शुभ असतो. * उत्तर व पश्चिम दिशेला समांतर रस्ता असणेही शुभ मानले जाते. * कोणत्याही जमिनीच्या पूर्व व उत्तरेला रस्ता असून ईशान्य कोनात गोलाकृती दोन रस्ते मिळालेले असतील तर ते अशुभ आहेत. * कोणत्याही जमिनीच्या पूर्व व दक्षिण दिशेला आग्नेय कोनात गोलाकृती रस्ते मिळाले असतील तर अशुभ फळ मिळते. * जमिनीच्या पूर्व व उत्तर दिशेला रस्ता असेल तर त्या घरात राहणार्यांना आरोग्य, संपत्ती व समृद्धी मिळते. * जमिनीच्या दक्षिणेला रस्ता आणि नैऋत्य कोन 90 अंशापेक्षा जास्त असल्यास असा प्लॉट अशुभ असतो. * ज्या जमिनीच्या चारी कोपर्यांवर दक्षिणोत्तर ध्रुव असतो तेथे राहणार्याला यशःप्राप्ती होत नाही.
विथीशुला :- म्हणजे असा रस्ता जो सरळ घरापर्यंत येऊन संपतो. असा रस्ता काही ठिकाणी शुभ व काही ठिकाणी अशुभ असतो.
शुभ विथीशुला :- * उत्तरेकडून ईशान्य कोपर्यावर * पश्चिमेकडून वायव्य कोपर्यात होणारी विथीशुला * दक्षिणेकडून आग्नेय कोपर्यावर
अशुभ विथीशुला :- * उत्तरेला वायव्य कोपर्यात * पश्चिमेकडून नैऋत्येला * दक्षिणेकडून नैऋत्येला * पूर्वेकडून आग्नेयेला
(अनुवाद- सौ. भाग्यश्री कुलकर्णी)
|