शिवाजी नाट्य मंदिर मध्ये 12 ऑगस्ट ला राजगति नाटकाच्या प्रस्तुतीने साजरा होणार 28वा सूत्रपात दिवस !

tor logo
Last Modified गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (16:12 IST)
नाटक : राजगति नाटकाची प्रस्तुती

कधी : 12 ऑगस्ट, 2019,
सोमवारी, सकाळी 11 वाजता
वेळ :120 मिनिटं
कुठे : श्री शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम), मुंबई
लेखक – दिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज
कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाति वाघ, प्रियंका कांबळे, सचिन गाडेकर, सुरेखा साळुंखे, अन्य कलाकार।

उद्देश्य : 27 वर्षांआधी म्हणजे 12 ऑगस्ट, 1992 रोजी ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताचे सूत्रपात झाले होते. त्यावेळी जागतिकीकरणाचा अजगर प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरवत होता. भांडवलशाही ने जगाला ‘खरेदी आणि विक्री’ पर्यंत मर्यादित केले होते. भांडवलशाही सत्तेच "जागतिकीकरण" हे ‘विचाराला कुंद, खंडित आणि मिटवण्याचे षड्यंत्र आहे. तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा कट रचत आहे. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा खेळ आहे. फॅसिस्ट ताकदीचे परिणाम आहे जागतिकीकरण ! लोकतंत्र, लोकतांत्रीकरणाच्या संविधानिक परंपरांची खिल्ली म्हणजे “जागतिकीकरण”! अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान आहे... या आव्हानासमोर उभे आहे “थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांत.

मागील 27 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’, ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७”, मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ”, शेतकऱ्यांची
आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’ , कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”, शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी”, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’ नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे !
play raigati
मागील 27 वर्षांपासून सतत कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर हे नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व दाखवत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!

जागतिकीकरण आणि
फॅसिस्टवादी शक्ती ‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती, जी माणसाला माणूस बनवते !

संपूर्ण जगात आता अवकळा पसरली आहे. जागतिकीकरणाच्या अफुने तर्काला नष्ट करून माणसाला आस्थेच्या पुढ्यात नेऊन ठेवले आहे. निर्मम आणि निर्लज्ज भांडवलशाही सत्ता मानवतेला पायाखाली चिरडत आहे. विकास पृथ्वीला गिळत आहे. विज्ञान तंत्राच्या बाजारात देहविक्री सम विकले जात आहे. भारतात याची उदाहरणे टोकावर आहेत आणि समजण्या पलीकडे आहेत. चमकणाऱ्या तापमानामुळे लहान मुलांच्या मृत्यूची सुनामी आणि चंद्रयानाची भरारी. दहा लाखाचे सूट आणि वस्त्रहीन समाज. लोकतंत्राच्या सुंदरतेला कुरूप करणारे गर्दीतंत्र आणि धनतंत्र. न्यायासाठी दारोदारी भटकणारा समाजातला खालचा वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणारे सुप्रीमकोर्ट. संविधानामूळे स्वतःचे पोट भरणारे कर्मचारी आज आपल्या कर्माने राजनेत्यांची लाथ खाण्यासाठी शापित आहेत. चौथी आर्थिक महासत्ता आणि बेरोजगारांची गर्दी. जेव्हा जेव्हा मानवाचे तंत्र असफल होते, तेव्हा तेव्हा अंधविश्वास आस्थेची चादर ओढून विक्राळ रूप धारण करत, समाजाला गुंडाळून घेतो. लंपट गर्दीच्या जोरावर सत्तेत येतात आणि मीडिया पीआरओ बनते. समाज एका ‘फ्रोजन स्टेट’ मध्ये जातो. ज्याला तोडण्यासाठी माणसाला आपल्या विकारांपासून मुक्तिसाठी ‘विचार आणि विवेकाला' जागवणे आवश्यक आहे. वैचारिकतेचे पेटंट ठेवणारे वामपंथी, जडत्व आणि प्रतिबद्धतेचा फरक नाही समजून घेत. टीकेच्या नावाखाली मारक्या बैलांसारखे उधळतात. गांधीचा राजनैतिक विवेकशील वारसा मातीत कोसळला आहे. संविधान आणि मानवी मूल्यांना वाचवण्यासाठी राजनैतिक परिदृश्याला बदलण्याची आवश्यकता आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कतरिना ने सांगितलं सलमानच्या लग्नाबद्दल, व्हिडीओ तुफान ...

कतरिना ने सांगितलं सलमानच्या लग्नाबद्दल, व्हिडीओ तुफान व्हायरल
मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ बॉलीवूड ज्याच्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहे. होय आम्ही ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...