फळे आणि भाज्या केमिकलयुक्त तर नाही?
फळे आणि भाजीपाला रासायनिक पद्धतीने पिकवला जात आहे. यामुळे अनेक आजार होत आहे. भाज्या ऑर्गेनिक आहे की नाही या प्रकारे जाणून घ्या-
फळे आणि भाज्या लवकर पिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो.
रात्रभरात भाज्या पिकवण्यासाठी केमिकल इंजेक्शन्सचा वापर केला जातो
इंजेक्शनने तयार केलेल्या भाज्यांमुळे रक्तदाब, किडनी, यकृत, पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती यासंबंधी समस्या निर्माण होतात.
या भाज्यांचा रंग, चमक आणि चव यावरून ओळखता येतं. या नेहमीपेक्षा वेगळ्या दिसतात.
फळे पिकवण्यासाठी, रंग, गोडवा आणि आकार वाढवण्यासाठी इंजेक्शन, कार्बाइड आणि इतर रसायनांचा वापर केला जातो.
रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, पोटाचे गंभीर आजार, रक्तदाब, जुलाब, उलट्या, इतर समस्या होतात.
जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त गडद रंग आणि मोठ्या आकाराची मुळीच डाग नसलेली किंवा बिया नसलेली फळे दिसली तर सावध व्हा.