'गाजर' आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. आपल्या आरोग्यास लागणारी अनेक पोषकतत्त्वे गाजरामध्ये असल्याने त्याला 'आरोग्य रक्षक' ही म्हटले जाते. लाल, रसपूर्ण गाजरामध्ये आपल्याला उपयोगी असलेल्या अनेक गोष्टी लपलेल्या असतात. त्यामुळे कच्चे गाजर भरपूर प्रमाणात सेवन केले पाहिजे. गाजरामध्ये असलेले गुण- * कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भव असतो.
* गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे. * गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करू नये.
* गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे. * गाजरामध्ये विटामीन 'ए' मुबलक प्रमाणात असल्याने नेत्र रोगावर लाभदायक आहे. * गाजरामध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुण असतो. 10-15 दिवसात गाजरचा रस प्यायल्याने रक्तविकार, गाठी, सूज व त्वचेसंदर्भात आजार बरे होतात. गाजर चावून चावून खाल्ल्याने दात व हिरड्या तंदरुस्त व स्वच्छ होतात.
* दररोज गाजरचा रस प्यायल्याने दृष्टी प्रखर होत असते.
* गाजरचा कीस करून त्यात चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्याने खाज तसेच त्वचेचे आजार दूर होतात.
* गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं पूड, मिरे पूड व लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पाचनक्रिकेसंदर्भात अडचणी दूर होतात.
* भाजलेले गाजर हृदय विकारावर लाभदायी आहे.
* उन्हाळ्यात गाजराचा मुरंबा स्मरणशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतो.