| | साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांच्या संदर्भात वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आज पर्यंत चकार शब्द न काढणाऱ्या साहित्यिकांनी अखेर जनतेच्या आणि माध्यमांच्या दबावानंतर वारकऱ्यांच्या कथित समांतर सेन्सॉर बोर्डा विरोधात निषेधाचा झेंडा उभारण्याचे धैर्य दाखवले.राज्यातील प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. काही जणांनी साहित्य संमेलनात वाद निर्माण करून साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा या संमेलनात निषेध करण्यात येत असल्याचे नमूद करत संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांच्या विरोधात वारकऱ्यांनी.... |