साहित्य : मटण 1 किलो, तूरडाळ 1 कप, मसूर डाळ 4 टेबल स्पून,चण्याची डाळ 4 टेबल स्पून, मूग डाळ 2 टेबल स्पून, कांदा 4, टोमॅटो 4-5, लाल भोपळा 200 ग्रॅम, बटाटे 3-4, वांगे 2, मेथीचीपाने 2 कप, धणे 2 टेबल स्पून, जिरे 2 टेबल स्पून, सांबार मसाला 2 टी स्पून, आलं-लसूण पेस्ट 4 टेबल स्पून, काळेमिरे अर्धा टी स्पून, लाल मिरच्या 4-5, सुंक खोबरं 4 टेबल स्पून, पुदिना, कोथिंबीर, तेल, मीठ, हळद.
कृती : मटण स्वच्छ धुऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करनू त्याला 1 चमचा आलं-लसूण पेस्ट व थोडंसं मीठ लावून ठेवा. कांदा व टोमॅटोही बारीक चिरून घ्या. धणे, जिरे, काळेमीरे, लाल मिरच्या व सुकं खोबरं हलकं भाजून बारीक वाटा. सर्व डाळी अर्धा तास भिजत ठेवा. वांगे, भोपळा, मेथी, बटाटे बारीक चिरा. मटणाचे तुकडे, सर्व भाज्या, लाल तिखट, एका कांद्याचे तुकडे, हळद, मीठ व सर्व डाळी कुकरमध्ये एकत्र शिजण्यास ठेवा.
मटण शिजेपर्यंत शिट्या घ्या. कुकर उघडल्यावर त्यातून मटणाचे तुकडे काढून बाजूला ठेवा. डाळी व भाज्या रवीने घुसळून एकजीव करा. दुसर्या भांड्यात तेल गरम करून त्यात उरलेला कांदा चांगला परता. मग त्यावर टोमॅटो घालून परता. त्यावर वाटलेला मसाला, सांबार पावडर घालून तेल सुटेपर्यंत परता. ह्या मसाल्यात डाळी-भाज्यांचं मिश्रण, मटणाचे तुकडे घालून एकत्र करा. मीठ घाला व 5 मिनिटं शिजवून गॅस बंद करा. पुदिना व कोथिंबिरीने सजवा.
|