साहित्य- 500ग्राम उकळलेले बासमती तांदूळ, 125ग्राम पत्ताकोबी, कांद्याची पात, 2गाजर, 1/2 वाटी हिरवे मटार भिजवून उकळवलेला, 10-15मशरूमचे टुकडे, 1/2 पाकीट सिजनिंग, 2मोठे चमचे सोया साँस, अजीनोमोटो, 2मोठे चमचे रेड चीली साँस, 250ग्राम मटनाचे तुकडे, तळण्यासाठी तिळीचे तेल, 2शिमला मिरच्या.
कृती- एका कढईत एक मोठा चमचा तिळीचे तेल गरम करा. त्यात सर्व भाज्या चिरून टाका व मटार टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यातच मटनाचे तुकडे, सोया साँस, चिली साँस, सिजनिंग, मशरूमचे तुकडे, स्वादानुसार अजिनोमोटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात उकळलेला तांदूळ टाकून मिक्स करा.
गरमागरम पुलाव टमाटर साँस व चिली साँस टाकून सर्व्ह करा.
|