साहित्य-- 3 उकडलेले अंडे, 2 उकडलेले बटाटे, 4 लवंग, 8-10 काळी मिरे, थोडे आले, 7पाकळ्या लसूण, 3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, चुटकीभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर , 2 कप पानी, 3 चमचे तेल.
कृती-- अंड्याचे दोन भाग करा. बटाट्याचे छोटे काप करा. आले-लसूण, हिरवी मिरची, लवंग, काळी मिरे बारीक करून घ्या. कढईत तेल गरम करून 3 काळी मिरे टाका. नंतर कोथिंबीर टाकून शिजवून घ्या. बारीक केलेला मसाला टाका. तेल सुटेपर्यंत भाजा. धने पावडर, गरम मसाला, मीठ, हळद टाकून दोन मिनीटे परतवा.
आता पानी टाकून उकळी आणा व अंडे टाका. दोन मिनिटांनी गँसवरून उतरवून घ्या. गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा.
|