लागणारे जिन्नस: चिकन, कडीपत्ता, 3 ते 4 हिरवी मिरची, लसूण-अद्रक पेस्ट, 2 टमाटे, 2 कांदे, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ
करावयाची कृती: प्रथम चिकन उकळवून घ्या. एका कढईत तेल घेऊन त्यात कडीपत्ता टाका. तसेच चिरलेला कांदा, टमाटे टाकून ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट टाका. मसाला तेल सोडू लागल्यावर त्यात थोडे पाणी टाका. उकळलेले चिकन टाकून आवश्यतेनुसार पाणी टाका. गरमा-गरम चिकन करी सर्व्ह करा.
|