1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड

गाजराच्या वड्या

- प्रीता गडकरी

साहित्य : 2 वाट्या गाजराचे छोटे-छोटे तुकडे, 1/2 वाटी खवा, पाव आटी दूध, 2 वाट्या साखर, वेलदोडेची पूड, काजू-बादामचे काप, तूप.

NDND
कृती :- एक चमच तुपावर गाजराचे तुकडे वाफवून घ्यावे. नंतर वाफवलेले तुकड्यांचा गोळा करून घ्यावा. वाफवलेल्या गोळ्यात दूध, खवा टाकून एकत्र शिजवावे. थोड शिजत आल्यावर साखर घालून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होत आले की वेलदोड्याची पुड घालून ते एकजीव करावे.

पातेल्यात गोळा खुटखुटीत झालेला वाटला की, ताटाला तूप लावून मिश्रण ओतावे. शंकरपाळ्याच्या किंवा चौकोनी आकाराच्या वड्या कापाव्या.
वरुन काजू व बादामाचे काप करून त्यानी वड्यांना सजवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा