मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > शाकाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रव्याचे खमंग ढोकळे
NDND
लागणारे जिन्नस :
2 वाट्या रवा, चिमूटभर सोडा, अद्रक-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, 2 चमचे नींबू रस, 3 चमचे गरम केलेले तेल, 1 चमचा इनो, मोहरी, कडीपत्ता, हिरवी कोथींबीर.

कृती :
रव्यात च‍िमुटभर सोडा टाकून 1-2 तास भिजवून ठेवा. तयार केलेली पेस्ट टाका. चवीनुसार मीठ, नींबूरस, 3 चमचे गरम तेल टाकून व्यवस्थित फेटून घ्या. तयार करताना या मिश्रणात इनो टाका. कूकरच्या डब्याला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओता. कूकरला शिट्टी न लावता १० मिनीट वाफवून घ्या. ईडली पात्रसुद्धा वापरता येते.

फोडणी : ढोकळे झाल्यावर त्याचे काप करून 1 चमचा तेलात मोहरी, कडीपत्ता, जीऱे टाकून फोडणीत परतून घ्यावे. गरमागरम ढोकळे कोथींबीर टाकून सर्व्ह करा.
आणखी
मका-ब्रेड रोल
तिरंगी सॅडविच
कॉर्न सँडविच
छोले-भटूरे
बनारसी गोटे
कांद्याचे लोणचे (सिंधी प्रकार)