वेळेची बचत करण्यासाठी काही कानमंत्र
१-२ दिवसांचा कांदा चिरून प्लॅस्टिकच्या एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे तो चांगला राहील व फ्रीजला कांद्याचा वासही येणार नाही. कांदा कोणतीही भाजी किंवा नाष्ता झटपट करायला केह्वाही उपयोगी पडेल.
कोशिंबिरीसाठी लागणारे गाजर, बीट, कोबी, मुळा वगैरे मोकळ्या वेळात एकदाच २-३ दिवसाला पुरेल एवढे किसून फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे म्हणजे त्यातील जीवनसत्त्वेही उडून जाऊन कमी होणार नाही व घाईच्या वेळेत पटकन पाहिजे तेवढी कोशिंबीर करून घेता येईल.
भाज्यांचा हिरवा रंग
भाज्यांचा हिरवा रंग टिकविण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा घालून भाज्या शिजवाव्यात. त्यामुळे हिरवा रंग राहतो.
खोबर्याचे काप
सुके खोबरे एक तास पाण्यात भिजत घालावे व नंतर काप काढावेत, म्हणजे काप काढावयास सोपे जाते. साल काढण्याचे जे यंत्र असते, त्याने काप काढावेत, म्हणजे काप लांब, पातळ व अगदी सारख्या जाडीचे व सुलभ रीतीने निघतात.
भाजीपाला शिळा झाला असल्यास पाण्यात लिंबाचा रस घालून, त्यात तो भाजीपाला एक तासभर बुडवून ठेवावा. भाजी ताजी व टवटवीत दिसू लागते.
टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
भाताला कढ आल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. भात पांढरा स्वच्छ होतो.
भात शिजत असताना दोन-तीन चमचे तूप घालावे. त्यामुळे भात मोकळा होतो.
बटाटे शिजविताना त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. त्यामुळे बटाटे शुभ्र होतात.
तेल तापविताना त्यात चिंचेचे बुटूक टाकावे, म्हणजे तेल फसफसून वर येत नाही.
| |
|