1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

फणस पनीर कोफ्ता

फणस पनीर कोफ्ता
ND
साहित्य : 1 वाटी लगदा (फणसाला व विळीला तेल लावून फणस कापून घ्या. फोडी मोठ्याही चालतील. चांगल्या धुवून कुकरमध्ये डब्यात पाणी न घालता 3 ते 4 शिट्या होऊ द्या. थंड झाल्यावर लगदा करा.) पाव वाटी किसलेले पनीर, पाव वाटी बटाट्याचा उकडून लगदा, पाव वाटी कॉर्नफ्लावर, थोडं मीठ, थोडी साखर व पाव चमचा मिरेपूड.

ग्रेव्हीसाठी साहित्य : टोमॅटो पांढरट रंगावर घेऊन त्याची प्युरी बनवून घ्या. 10-12 काजू भिजवून, तीळ भिजवून अर्धी वाटी, गरम मसाला दीड चमचा, आले पेस्ट 1 चमचा, लसूण पेस्ट पाव चमचा, पाव वाटी खोवा, थोडे वरून फ्रेश क्रीम.

कोफ्ता : उकडलेल्या फणसाचा गर, पनीर मळलेले व बटाट्याचा लगदा मिसळून घ्या. चवीनुसार मीठ, साखर व थोडी मिरेपूड घाला.
कॉर्नफ्लावर पाव वाटी घाला. चांगले कालवून छोटे छोटे गोलाकार कोफ्ते बनवून तेलावर लालसर तळून काढा. कोफ्ते बनवून ठेवा.

ग्रेव्ही - गरम कढईत तेल घालून (भरपूर तेल) जिरे घाला. काजू व तिळाची वाटलेली पेस्ट घाला. परता, आल्याची पेस्ट व लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी घाला. चांगली परता. बाजूंनी तेल सुटेल. थोडा खोवा घाला, परता, गरम मसाला घाला व थोडे दूध मिश्रीत पाणी घाला. मीठ व थोडी साखर घाला. ग्रेव्ही चांगली उकळू द्या. फ्रेश क्रीम घाला, गॅस बंद करा. देताना डिशमध्ये कोफ्ते घालून वरून ग्रेव्ही घाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा