1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

शेंगोळ्या

ND
साहित्य : तुरीची डाळ, धने, जिरे, मिरे, मीठ, तिखट, ओले खोबरे, फोडणीचे साहित्य.

कृती : तुरीच्या डाळीत धने, जिरे व मिरे भाजून घालावे व डाळ दळून त्याचा रवा काढावा. नंतर त्यात मीठ व तिखट घालून व पाणी घालून थालीपिठाच्या भाजणीइतपत भिजवावे व त्याचे लांबट गोळे करून, ते मोदकपात्रात उकळून घ्यावे. नंतर त्यांच्या पातळ चकत्या कापून, त्या चकत्या हिंग-मोहरीच्या फोडणीत टाकाव्या व त्यांवर ओले खोबरे घालावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा