1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

उंबराच्या फळाची भाजी

MHNEWS
साहित्य : पाव किलो उंबराची कच्ची फळे, ३ ते ४ लसूण पाकळया, एक मोठा कांदा, २ मिरच्या, धनापूड पाव चमचा, जिरे फोडणीसाठी, ८ ते १० काळीमिरी, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरीचे तेल.

कृती:- उंबराची फळं स्वच्छ धुवून कापून घ्यावीत. त्यानंतर ती उकडून घेऊन व्यवस्थित कुस्कुरुन घ्यावीत. वरील सर्व मसाल्याची सामग्री वाटून घ्यावीत. त्यानंतर कढईत मोहरीचे तेल गरम करावे. या तेलात कांदा फोडणीला टाकावा. त्यानंतर त्यात उंबराची कुस्करलेली फळे घालावीत. त्यात गरम मसाला घालावा आणि १० मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावी. गरम पोळी किंवा भाताबरोबर ही भाजी उत्तम लागते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा