ईडीच्या नावाने तिघांची लाखो रुपयांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

ED
Last Modified शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:36 IST)
सध्या प्रवर्तन निदेशालय ईडी च्या नावाने अनेकांना धास्ती भरते, त्यामुळे आता भामट्यांनी या दहशतीचा उपयोग करायचे सुरु केले आहे. ईडी हा शब्द प्रयोग जास्त प्रसिद्ध झाल्याने तर त्याबद्द्दल पूर्ण माहिती नसल्याने याचाच फायदा घेऊन आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोघा भामट्यांनी सुध्दा ‘ईडी’नावाचा आधार ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे तीघांना लाखो रूपयांना गंडा घातला आहे. याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.

आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार सोमोर येतात, त्यात अनेकदा फसवणूक होऊन देखील इतर नागरिकही त्याला बळी पडतात आणि आर्थिक नुकसान होऊन जाते.

दामदुप्पट रकमेच्या आमिषापोटी अद्यापही नागरिक आपली आर्थिक फसवणूक करून घेत आहे. दोघा भामट्यांनी अशाचप्रकारे तिघांना चक्क ‘ईडी’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे.

भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती की, सिन्नर तालुक्यातील वावी गावातील दोघे संशयित सतीश बनसोडे (३५) व सचिन वेलजाले (३६) यांनी फिर्यादी सीमा भाऊसाहेब काळे (३२, रा. आळे फाटा, नारायणगाव) यांच्यासह संदीप काठे, संदीप लामखेड यांना प्रत्येकी अनुक्रमे २ लाख, ३ लाख आणि १ लाख रुपयांची गुंतवणूक करा असे सांगितले. दोघा भामट्यांनी त्यांना ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे दामदुप्पट रक्कम केवळ आठ दिवसात देण्याचे आमिष दिले, यातील तिघांचा त्यांनी पूर्ण
विश्वास संपादन केला आणि
फिर्यादी काळे यांच्यासोबत
काठे, लामखेडे यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम ‘गुगल पे’द्वारे आॅनलाइन स्वत:च्या खात्यात जमा केली.

काही दिवसांनी गुंतवणूक केलेले पैसे मिळावे म्हणून तिघांनी वारंवार संपर्क केवळ, मात्र संबंधित दोघा भामट्यांनी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे यांच्या लक्षात आले. काळे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयित दोघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बनसोडे व वेलजाले यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वर्‍हाडे करीत आहेत.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी
हैद्राबादमधील गांधीनगर परिसरात लॉकडाऊन दरम्यान बंद दारुचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार ...

करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी

करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हरयाणा या राज्यात 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...