केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

ashok chouhan
पुणे| Last Modified सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील महामार्गांची कामे खडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या
भारंभार घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी लागणारा निधी न दिल्यामुळे सध्याच्या घडीला अनेक रस्त्यांची कामे खोळंबल्याचे त्यांनी म्हटले.

गेल्या वर्ष-दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. रसत्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यंनी म्हटले.
यावेळी चव्हाण यांनी खेड शिवापूरच्या आंदोलनासंदर्भातही भाष्य केले. खेड शिवापूरचारस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. केंद्र सरकारचा हा रस्ता टोलवर आधारीत करारानुसार तयार झाला आहे. टोल नाक्यासंदर्भात भाजपचे केंद्रींत्री गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते. या टोल नाक्याला विरोध होता तर भाजपने या रस्त्याचे बांधकाम सुरु असतानाच आपली भूमिका मांडायला हवी होती, असे चव्हाण यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Facebookचे Collab एप TikTok शी स्पर्धा करेल

Facebookचे Collab एप TikTok शी स्पर्धा करेल
टिकटॅक प्रमाणे, वापरकर्ते कोलाब एपवर त्यांचे स्वतःचे व्हिडिओ तयार करु शकतात आणि इतर ...

कामाची गोष्ट : Aadhar वर E-KYC ने त्वरित मिळेल PAN

कामाची गोष्ट : Aadhar वर E-KYC ने त्वरित मिळेल PAN
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड धारकांना PAN क्रमांक देण्याची सेवा सुरू केली.

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा
टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंमुळे आता लोक भारतीय अॅप मित्रो (Mitron) कडे वळत आहे. एक ...