1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (09:11 IST)

"शिंदे साब बढीया काम कर रहे है", पुण्यात कालीचरण महाराजांची स्तुतीसुमने

Eknath shinde
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेल्या कालीचरण महाराजांनी आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. पुण्यातील शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टकडून आयोजित म्हसोबा उत्सवाच्या दीप अमावस्येनिमित्त कार्यक्रमात कालीचरण महाराज उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
"राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला आमचा पाठिंबा आहे. शिंदे साब बढीया काम कर रहे है. त्यांनी दोन शहरांचं नामांतर केलं.
 
"शिंदे सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे," असं कालीचरण महाराज म्हणाले.