गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (12:40 IST)

मॅन्युअल गिअर कार चालविताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

आज बऱ्याच मोटारी स्वचलित ट्रान्समिशनसह येत आहेत, या कार जाम लागतं त्या परिस्थितीत खूप प्रभावी आहेत आणि त्या चालविताना थकवा देखील येत नाही, परंतु बऱ्याच लोकांकडे मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या मोटारी असतात. आपण देखील मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली मोटार चालवत असल्यास तर ड्रायव्हिंग करताना आपल्याला या 5 गोष्टी लक्षात ठेवा.
 
* आपले हात स्टीयरिंगवर ठेवा - 
कार चालविताना बहुतेक लोकांची सवय असते की ते आपला एक हात स्टीयरिंग व्हीलवर ठेवतात आणि दुसरा हात गिअर लिव्हर वर ठेवतात. असे चुकीचे आहे. गिअर लिव्हर वर थोडंसं दाब देखील गिअरबॉक्स खराब करू शकतो. अशा परिस्थितीत स्टीयरिंगव्हील वर आपला हात घड्याळीतल्या सव्वा नऊ किंवा पावणे तीन या स्थितीत असावा. 
 
* क्लच पासून पाय लांब ठेवा - 
वाहन चालविताना बरेच लोक क्लचवरच पाय ठेवतात जेणे करून गिअर बदलणे सहज होईल, पण जर आपल्याला देखील ही सवय असल्यास त्वरितच बदला. या चुकीच्या सवयीमुळे आपल्याला क्लच लवकरच बदलावे लागू शकत. याचे एक नुकसान असे देखील आहे की जर आपल्याला ब्रेक लावण्याची गरज भासल्यास नकळत एकाएकी आपले अवचेतन मन ब्रेक लिव्हर दाबण्या ऐवजी क्लच लिव्हर दाबू शकता. ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
 
* हॅण्डब्रेक वापरा -
डोंगराळ मार्गावर वाहन चालविताना अनुभवी लोक उतारावर हॅन्डब्रेक्स वापरतात. साधारणपणे ड्रॉयव्हर क्लच पॅडलवर थोडंच दाब ठेवून पाय ठेवतात, ज्यामुळे त्यांना असे वाटत की गाडी त्यांचा नियंत्रणात असेल, पण या ठिकाणी हॅन्डब्रेकचं वापरावे.

* उतारावरून गाडी घेताना नेहमी गाडी गिअरमध्ये ठेवा-
 काही लोक उतारावरून गाडी घेताना गिअर न्यूट्रल मध्ये ठेवतात. लोक हे विचार करतात की या मुळे तेल वाचत पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्यामुळे वाहनावर इंजिनचे नियंत्रण राहत नाही, तसेच ब्रेक्स देखील जास्त तापतात. चांगले आहे की उतारावरून गाडी काढताना त्याला गिअरमध्येच ठेवावं, जेणे करून आवश्यकतेनुसार कार सहजपणे नियंत्रित होईल.  
 
* RPM वर लक्ष ठेवा- 
बरेच लोक कारमधील लागलेल्या RPM मीटरला एक शोपीस समजतात, पण या द्वारे आपण आपल्या कारच्या इंजिनची कार्यक्षमता जाणून घेऊ शकता. RPM जास्त असणे किंवा उच्च असल्यास म्हणजे की आपण कारच्या इंजिनवर अधिक जोर देत आहात. बरेच लोक कार चालविताना अधिक आरपीएम वर देखील गीअर्स बदलत नाही, ही सवय इंजिनसह गिअरबॉक्सला देखील खराब करते. म्हणूनच कमी RPM वर गियर्स बदला.