testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबई : रेल्वे पूल घटना,निरपराध नागरिकांनी गमावले प्राण

mumbai local
फेरीवाला आणि इतर गोष्टीमुळे मुंबई येथील मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या दुखद दुर्घटनेत जवळपास 22 नागरिकांनी आपले जीव गमावला आहे. तर अनेक प्रवासी नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या मध्ये एकूण 39 जण जखमी झाले. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश
आहे.

शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

जेव्हा प्रवासी प्रचंड गर्दी झाली तेव्हा एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली.
मुंबईतील एलफिन्स्टन -परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि केंद्राने दिले. या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. जखमींना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली, एलफिन्स्टनवरील पुलाबाबत मी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला.

या प्रकरणामुळे रेल्वे पूल प्रश्न आणि रेल्वे पूल सुरक्षा समोर आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी याविरोधात भूमिका घेतली आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रामाचा रावण झाला अभिनेत्याचा पंजाब रेल्वे अपघातात मृत्यू

national news
देशातील घडलेला आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे झालेला पंजाब येतील अपघात आहे. पंजाबच्या ...

राष्ट्रवादीचा हा माजी आमदार देतो गलीच्छ शिव्या क्लिप झाली ...

national news
आमदार असलेल्या सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक (आबा) ...

अवनि अर्थात टी १ वाघीणीचा कोर्टाने मागवला आहवाल, याचुकेवर ...

national news
नागपूर खंडपीठानं यवतमाळची नरभक्षक वाघीण टी-१ अर्थात अवनी हिला पकडण्यासाठी किंवा ...

त्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात

national news
पंजाब येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील जोडा बाजार येथील रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ...

यवतमाळ १० करोडची रोकड जप्त

national news
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पिपरेवाडा टोल नाक्यावर 10 करोड रु ची रोकड जप्त करण्यात आली. ...