मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नित्यानंद स्वामी देशातून फरार - गुजरात पोलीस

स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद स्वामी देशातून फरार झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.  
 
नित्यानंद यांच्या दोन शिष्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुजरात पोलीस त्यांची चौकशी करत होते.
 
योगिनी सर्वज्ञपीठम येथील आश्रम चालवण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करून त्यांना देणगी गोळा करायला लावल्याप्रकरणी बुधवारी नित्यानंद यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली होती.
 
अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आर. व्ही. असारी म्हणाले की, "नित्यानंद परदेशात पळून गेले आहेत आणि गरज भासल्यास गुजरता पोलीस योग्यप्रकारे त्यांना ताब्यात घेईल."