testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एक महिन्यापूर्वीच झाली 'गोलमाल अगेन' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

golmal reaturns
Last Modified गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (15:02 IST)
गोलमाल सिरीजचा आगामी सिनेमा
'गोलमाल अगेन'
च्या पूर्वप्रसिद्धीला चांगलाच चेव फुटला आहे. गेल्या आठवड्यात सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचा ट्रेलर २४ तासांपेक्षा कमी वेळात २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे. शिवाय,
आता या चित्रपटाची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता या सिनेमाने प्रदर्शनापूर्वी आणखीन एक विक्रम केला आहे. प्रेक्षकांना पोटधरून हसायला लावणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला एक महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी पेटीएमशी भागीदारी केली असून,
अश्याप्रकारे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच होत असलेल्या तिकीट बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात'गोलमाल अगेन'
चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर हास्याची आतषबाजी करण्यास येत असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातील सिनेरसिकांचा या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून,
प्रत्येकजण सिनेमागृहातील आपापली जागा भरून ठेवण्याच्या प्रयत्नांत दिसून येत आहेत. सिनेमाच्या तिकीट बुकिंगबद्दल,रिलायन्स एन्टरटेन्टेन्मेंटचे एसआयओ शिबाशश सरकार असे सांगतात की, "सिनेमाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही फ्रॅंचायझीमार्फत येत्या दिवाळीत
'गोलमाल अगेन'
चा हास्यस्फोट चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे,
पेटीएमने आमच्यासोबत सहयोग केला असून,
त्यांच्या सहकार्याने प्रथमच आम्ही फिल्म रिलीजच्या चार आठवड्यांपूर्वीच तिकीट बुकिंग उघडण्यास तयार झालो."
golmal reaturns
एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंग उघडणारा पहिला भारतीय चित्रपट असण्याविषयी, 'गोलमाल अगेन'
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सांगितले की,
"आमचा सिनेमा अश्याप्रकारे लोकांपर्यंत मोठ्याप्रमाणात पोहोचत असल्याचे पाहून आनंद वाटतो आहे. प्रेक्षकदेखील प्रदर्शनापूर्वीच आगाऊ तिकीट विकत घेत आहेत.'गोलमाल अगेन'
ला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मी खुश आहे'.
पेटीएम अधिकृतरित्या चित्रपटाशी संलग्न झाले असून. त्याअंतर्गत संपूर्ण भारतामध्ये
'गोलमाल अगेन'
च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यात प्रेक्षकांना मूव्ही-फेअर ५०० रुपये किमतीचे व्हाउचर जिंकता येऊ शकते आणि

१०० पर्यंत रोख परतदेखील मिळवता येऊ शकते. तसेच काही ठराविक सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्समध्येसुद्धा सिनेमाची तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.


यावर अधिक वाचा :

'धडक'ला मिळाले २०१८ चे हायएस्ट ओपनिंग

national news
मराठी सिनेमा सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिवर चांगली ओपनिंग केली ...

असा आमचा युवराज खरंच बाई भोळा

national news
आधी मारली मिठी मग मारला डोळा असा आमचा युवराज खरंच बाई भोळा

निधी आणि राहुलचे फोटो व्हायरल

national news
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल ...

अप्रतिम संदेश : जगणं

national news
पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे ...

सोनाली बेंद्रेची मुलासाठी इमोशनल पोस्ट

national news
लंडन येथे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर ...