बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (15:40 IST)

‘कौन बनेगा करोडपती ९’ टीआरपीत टॉपवर

बिग बींचा ‘कौन बनेगा करोडपती ९’ हा शो टीआरपीच्या यादीत टॉपवर पोहोचला आहे. त्यामुळे बिग बींसोबतच सोनी वाहिनीसाठीही हा आठवडा जल्लोषाचा ठरला. नुकताच अमिताभ बच्चन यांनी आपला  ७५ व्या वाढदिवस साजरा केला. मात्र ऐवढ्या वर्षानंतर ही बिग बींची लोकप्रियता जराही कमी झालेली दिसत नाही. टीआरपीच्या गणितात बिग बीनी  सलमान खानच्या ‘बिग बॉस’ आणि अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’लाही मागे टाकले आहे.  केबीसीला या सिझनमध्ये जेव्हा पहिली कोट्यधीश अनामिका मजुमदार मिळाली, त्या आठवड्यातही शोच्या टीआरपी टॉपवर गेली आहे. 

सलमानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरात पहिलाच  दिवसापासूनच स्पर्धकांची नौटंकी पाहायला मिळाली. मात्र ही नौटंकी ही केबीसीला टक्कर देऊ शकलेली नाही. खिलाडी कुमारचा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांना फारसा भावला नाही. यावरुन एख गोष्ट स्पष्ट होते इतक्या वर्षातही  अमिताभ यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.