सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (14:21 IST)

निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये

‘बिग बॉस 14'च्या सीझनमध्ये टॉप 3 पर्यंत गेलेली स्पर्धक निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबद्दल स्वतः निक्कीने खुसाला केला आहे. मात्र, अद्याप हे समजू शकले नाही की, नेमक कुठल्या चित्रपटातून निक्की बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.
 
निक्कीने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिने  ‘कंचना 3', ‘चिकती गदिलो चितकोतुडु' आणि ‘थिप्पारा मीसम' अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. निक्कीने बिग बॉस 14 चे सीझन संपल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, बिग बॉस 14 च्या घरातील तिचा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता कारण बिग बॉसच्या घरात तिचे कोणी मित्र-मैत्रीण नव्हते आणि ती कोणालाही ओळखत नव्हती. त्यानंतर निक्की आणि रूबिनाची चांगली मैत्री झाली. बिग बॉस 14 ची विजेता रुबिना झाल्याबद्दल निक्कीला विचारण्यात आले तेव्हा निक्कीने सांगितले की, माझी बहीण बिग बॉस 14 ची विजेता झाली आहे याचा मला अतिशय आनंद आहे. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार? हे निकाला अगोदर शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला, त्यावेळी गुगलवर रुबिना दिलैकचे नाव येत होते, म्हणजेच गुगलने बिग बॉस 14 च्या विजेतची घोषणा आधीच केली होती.