शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (15:18 IST)

सलमान खान बनवणार गामा पहेलवानच्या जीवनावर शो

अभिनेता सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली सुप्रसिद्ध गामा पहेलवानच्या जीवनावर एक शो तयार करत आहे. पुढील काही महिन्यात या शोचं काम सुरू होणार आहे.  सलमान खानचा भाऊ सोहेल खान यात  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गामा पहेलवानच्या भावाच्या भूमिकेत मोहम्मद नजीम दिसणार आहे. 

 

गामा पहेलवानचं खरं नाव गुलाम मोहम्मद होतं. आपल्या पाच दशक लांब करिअरमध्ये गामा पहेलवानाने कधीही पराभव पाहिला नाही. सलमान खानच्या या प्रोजेक्टचं बजेट खूप जास्त असल्याचंही बोललं जात आहे. लहान आणि मोठ्या पडद्यावर व्हिलनच्या भूमिकेत दिसलेले पुनीत इस्सार याची कथा लिहित आहेत. तेच या शोचं दिग्दर्शन करतील.  या शोचं शूट एका सिनेमाप्रमाणे पंजाब आणि मुंबईतील सेटवर त्यासोबतच लंडनच्या स्टेडियमध्ये केलं जाणार आहे.