Sanjay Dutt: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला दुखापत
संजय दत्त बॉलीवूडमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, मात्र अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाला आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी कन्नड चित्रपट 'केडी: द डेव्हिल' साठी बेंगळुरूच्या परिसरात शूटिंग करत आहे. हा अपघात झाला तेव्हा तो चित्रपटातील ब्लास्ट सिक्वेन्सचे शूटिंग करत होता.
रिपोर्ट्सनुसार, त्याच्या हाताला, चेहऱ्याला आणि कोपरावर जखमा झाल्या आहेत. तो फाईट मास्टर रवि वर्मा यांच्या 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटासाठी फाईट सीनची तयारी करत होता. याचदरम्यान हा अपघात झाला आणि अभिनेता त्याचा बळी ठरला. संजय दत्त बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. या घटनेनंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत.
'केडी: द डेव्हिल' या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त अखेरचा 'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
Edited By - Priya Dixit