सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (10:58 IST)

'धूम4'चा शाहरुख खलनायक

प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. नायकाच्या भूमिकांपेक्षाही या चित्रपटांतील व्हिलनच्या भूमिकाच अधिक उठून दिसल्या आणि याच भूमिकांना प्रेक्षकांनीही पसंती दिली. आता शाहरूख खानची व्हिलन म्हणून 'धूम' चित्रपटाच्या चौथ्या भागासाठी निवड केल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शाहरूखने गेल्या अनेक चित्रपटांतून मिळालेल्या अपयशामुळे आता दिग्दर्शकांच्या बाबतीत निवड करण्यात तत्परता ठेवलेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी सलमानची निवड केली असल्याचे म्हटले जात होते. पण आता या भूमिकेसाठी शाहरूखची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. व्हिलन म्हणून शाहरूखचा हा पहिला चित्रपट नाही. त्याने याआधीही 'डर' आणि 'बाजीगर'सारख्या चित्रपटांत व्हिलनची भूमिका साकारली होती. हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.