testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बिग बी आणि श्रीदेवी पुन्हा एकाच चित्रपटात

श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन खुदा गवाह चित्रपटानंतर तब्बल तीन दशकानंतर एकत्र झळकणार आहेत. 2012 मध्ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटात अमिताभ यांनी श्रीदेवीसोबत स्क्रिन शेअर केला होता हे जरी खरं असलं तरी ही जोडी मुख्य भूमिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे.
चिनी कम पा आणि शमिताभ यासारखे चित्रपट अमिताभसोबत दिग्दर्शित करणार्‍या आर.बाल्की यांनी श्रीदेवीसोबत बिग बी यांन घेऊन चित्रपट बनवण्याचा घाट घातला आहे. ब्रिजेस ऑ‍फ मेडीसन कंट्री या कथेच्या पार्श्वभूमीवर नव्या चित्रपटाची कथा बेतली असल्याचे सूत्रांकडून समजते. बिग बी आणि श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे. यापूर्वी आखरी रास्ता आणि खुदा गवाह मध्ये श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन एकत्र होते.
श्रीदेवीने मॉम मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केल्यावर तिच्या अशाच एखाद्या संस्मरणीय भूमिकेची प्रतीक्षा होती. अमिताभ यांच्या बरोबरच्या रोलमध्ये ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते.


यावर अधिक वाचा :