गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (22:05 IST)

Gourd Murabba : दुधी भोपळ्याचा मुरांबा

murabba
साहित्य: दुधी भोपळ्याचा कीस ३ वाटय़ा, कैरीचा कीस १/२ वाटी, साखर ३-१/२ वाटय़ा, वेलची पूड २ चमचे, केशरकाडय़ा १/२ चमचा.
 
कृती: प्रथम दुधी भोपळा व कैरी वेगवेगळे किसून घेऊन नंतर एकत्र करणे व त्यात साखर घालून १० मिनिटे तसेच ठेवणे, साखर हळूहळू विरघळू लागेल नंतर गॅसवर ठेवून उकळणे. साधारण एकतारी झाला असे वाटले की गॅस बंद करून त्यात केशर व वेलची पूड एकत्र करून थंड झाल्यावर बाटलीत भरणे. पारदर्शक असा हा मुरांबा दुधी भोपळा प्रकृतीने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम.