रविवार, 21 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated : गुरूवार, 16 मे 2019 (11:46 IST)

कैरी-भोकरांचे चविष्ट लोणचे

Gum Berry Pickle
साहित्य : कच्ची भोकरे एक किलो, कैरीच्या सालासकट फोडी अर्धा किलो, एक वाटी मेथीचा जाडसर रवा, तीन चे चार चमचे हिंग, अर्धी वाटी मोहरीची डाळ, चार चमचे हळद, एक वाटी लाल तिखट, तेल.
 
कृती : भोकरे जरा ठेचून, त्यांना मीठ लावून, त्यांतील बिया व चिकट पदार्थ असतो, तो काढून टाकावा. मीठ लावल्याने चिकटपणा कमी होतो. कैरीच्या सालीसकट फोडी कराव्या. मेथीचा रवा तेलात बदामी रंगावर करून घ्यावा व मग त्या तेलात हिंग, मोहरी व हळद घालून, फोडणी करून, ती गार झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ व वरीलप्रमाणे तयार केलेला मेथीचा रवा घालून एकत्र कालवावे. हे मिश्रण भरल्या वांग्याप्रमाणे भोकरात भरावे. नंतर भरलेली भोकरे व कैरीच्या फोडी एकत्र करून, बरणीत भरून, त्यावर लोणचे चांगले बुडेपर्यंत तेल घालून ठेवावे.