सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

पॅरेंटिंग टिप्स : करा आत्मपरीक्षण

मूल पहिल्यांदा खोटं बोलतं तेव्हा वाईट वाटतं. आपले संस्कार निष्प्रभ झाल्याची भावना दाटून येते. या निराशेपोटी मुलाला कठोर शिक्ष केली जाते. 
 
त्यांच्याशी अबोला धरला जातो पण हाच क्षण असतो जेव्हा आपण आपल्या वगणुकीचं परीक्षण करायला हवं. चार-पाच वर्षाच्या मुलांना हेतूपुरस्सर खोटं बोलण्याचं ज्ञान नक्कीच नसतं. पालकांडून कौतूक मिळवण्यासाठी, त्यांच्या रागाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी, वेळ मारुन नेण्यासाठी अनाहूतपणे त्यांच्याकडून खोटं बोललं जातं. कधी तरी त्यांनी आई बाबांना सिग्नल तोडताना, फोनवर खोटं कारण  सांगताना, गॉसिप करताना पाहिलेलं असतं. ते केवळ अनुकरण करत असतात. म्हणूनच मूल खोटं बोलताना आढळलं तर न रागवता त्यांना विश्वासात घ्या. खोटं बोलण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या. शिक्षेने नव्हे तर संवादाने हा प्रश्न सुटू शकेल.