testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बाळाची बेंबी बाहेर आलीय?

baby's barboon
Last Modified मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (00:18 IST)
अनेक जन्मजात बाळांची बेंबी किंवा नाभी बाहेर आलेली असते. ही एक नैसर्गिक बाब असली तरी काही वेळा ती सामान्य स्थितीपेक्षा अधिक बाहेर आलेली असते आणि मोठी असते. त्याचे कारण अ‍ॅम्बिकल हार्निया असू शकते. वस्तुतः बाळांमध्ये ही समस्या आपोआप बरी होते. मात्र 3-4 वर्षांपर्यंत बाळाची बेंबी बाहेर आलेली, मोठी दिसत असेल तर मात्र हे अम्बिकल हार्नियाचे संकेत असू शकतात. काय आहे ही समस्या जाणून घेऊया.

बाळाची बेंबी : बाळाचा जन्मापूर्वी आईच्या पोटात असताना जो विकास होतो त्यासाठी आवश्यक पोषक घटक आईशी जोडलेल्या नाळेतून मिळतात. ही नाळ बाळाच्या बेंबीशी जोडलेली असते. जन्मानंतर बाळासमवेत ही नाळ बाहेर येते. तेव्हा तीबांधली जाते आणि कापून टाकली जाते. नाळेमध्ये कोणतीही नस किंवा रक्तवाहिनी नसते. त्यामुळे बाळाला त्याच्या काही वेदना होत नाहीत. नाळ बांधली नाही तरीही आपोआप बंद होते.

अ‍ॅम्बिलिकल हार्निया का होतो? जन्मानंतर 3 वर्षांपर्यंत बाळाच्या अंतर्गत अवयवांचा विकास होत असतो. पोटाच्या कमजोर भागावर एखाद्या अंतर्गत अवयवाने दाब दिला तर तो भाग वर येतो. त्याला
अ‍ॅम्बिलिकल हार्निया म्हणतात. मुलांमध्ये हार्नियाची ही समस्या सामान्यपणे आढळते. मात्र, मोठ्यांमध्येही ही समस्या आढळून येते. सुरुवातीच्या काळात 10 टक्के मुलांत ही समस्या निर्माण होते. बहुतेक मुलांमध्ये ही समस्या आपोआप बरी होते.

वर आलेल्या बेंबीवर उपचार - बाहेर आलेली बेंबी 3-4 वर्षे वयापर्यंत नीट न झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते. अनेकदा या हार्नियामुळे मुलांना पोटात दुखते. किंवा रक्ताभिसरणाची समस्या निर्माण होते. तेव्हाही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. आतड्यांना पीळ पडल्यानेही मुलांना पोटात दुखते. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क करणे उत्तम.

अ‍ॅम्बिलिकल हार्नियाची तपासणी- सर्वसाधारणपणे बाळाची बेंबी पाहूनच डॉक्टर अ‍ॅम्बिलिकल हार्नियाविषयी निदान करतात. अनेक प्रकरणात एक्स रे आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करुनही अ‍ॅम्बिलिकल हार्नियामुळे शरीरात काही त्रास किंवा कोणत्याही अंतर्गत अवयवांवर दबाव तर पडत नाही ना याची तपासणी केली जाते. त्याशिवाय रक्तातील संसर्ग किंवा एस्केमिया असल्याची शंका आल्यास रक्ताची तपासणी केली जाते.
डॉ. प्राजक्ता पाटीलयावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

national news
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी ...