शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (16:33 IST)

राज्यात कोरोना व्हॅक्सिनचे नियोजन सुरु,पोलिसांसोबत वृद्ध नागरिकांना कोरोनाची लस देणार

कोरोना लस लवकर यावी ही आशा, व्हॅक्सिन देण्यासाठी नियोजन सुरु आहे. पोलीस,  डॉक्टर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना सर्वात आधी डॉक्टर्स, पोलिसांसोबत वृद्ध नागरिकांना कोरोनाची लस देणार आहोत. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
कोरोना व्हॅक्सिन लवकर येत आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यात येईल आणि तसे नियोजन सध्या सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून आणि केंद्र सरकारच्या प्रोटोकॉल नुसारच कोरोना व्हॅक्सिन देण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.