1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

Diwali Recipe Satori दिवाळी स्पेशल खुसखुशीत साटोऱ्या

satori recipe
साहित्य - 1/2 कप मैदा, 2 चमचे रवा, 1/2 कप तेल, 1/2 कप साजूक तूप, 1 कप पाणी, चिमूटभर वेलची पूड, 1 कप पिठी साखर, 1 कप किसलेले खोबरे.
 
कृती - एका भांड्यात मैदा, रवा, जरासं आवड असल्यास मीठ घालून एकत्र करा. सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा. आता भांड्यात थोडं-थोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. पिठाला सेट होण्यासाठी दोन ते तीन तास ठेवून द्यावे.
 
सारण तयार करण्याची कृती - एका भांड्यात बारीक किसलेले सुके खोबरे, पिठी साखर, चिमूटभर वेलची पूड मिसळा. सारणाचे लहान-लहान लाडू वळून घ्या. 
 
आता मळलेले पिठाला एक सारखे करून त्याचा लहान लहान गोळ्या बनवून पुरीचा आकार द्या. आता या पुरी मध्ये सारणाचे लाडू मोदका सारखे भरून पोळी प्रमाणे लाटून घ्या. या लाटलेल्या पोळीला एका पॅन मध्ये थोडसं तूप घालून शेकून घ्या. दोन्ही कडून चांगल्या प्रकारे तांबूस रंग येई पर्यंत शेका. साटोरी तयार. आपण आवडीप्रमाणे शेकल्यावर साटोर्‍या तुपात तळू देखील शकतात. खुसखुशीत राहतात.