गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (16:50 IST)

आषाढी एकादशी विशेष रेसिपी चविष्ट भगर ढोकळे

Bhagar Dhokala recipe
साहित्य :
1 वाटी दही, 
100 ग्रॅम शिंगाडा पीठ,
200 ग्रॅम भगर, 
100 ग्रॅम राजगिरा पीठ, 
जिरे,
सेंधव मीठ, 
सोडा,
बारीक चिरलेली कोथिंबीर, 
तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल. 
 
कृती -
सर्वप्रथम भगर 2 तास भिजत ठेवा.
दही फेणून राजगिरा आणि शिंगाडापीठ मिसळा.
भगर वाटून सर्व जिन्नस एकत्र करून तयार करावे. या मध्ये एक चमचा सोडा आणि मीठ घालून फेणून घ्या. 
हे मिश्रण कुकरच्या डब्यात भरून एक शिट्टी द्या.
आता हे मिश्रण थंड होऊ द्या. 
थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. 
एका पॅनमध्ये तेल तापत ठेवा आणि त्यामध्ये जिरे घाला आणि ही फोडणी ढोकळ्यावर घाला.
वरून कोथिंबीर घालून दह्यासह सर्व करा.