शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Updated : गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (08:49 IST)

Batata Puri बटाटा पूरी

fasting puri
साहित्य :-
२ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, 5 मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, २ टेस्पून शिंगाडा पिठ, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
 
कृती :-
१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घाला. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
 
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा. 
 
तेल तापत ठेवा. प्लास्टिकवर तेलाचा हात लावून प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडा. पुरी तेलात टाकल्यावर झार्‍याने अजिबात पलटू नये अशाने ती तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी. छान ब्राऊन रंग आल्यावर काढून घ्या. गरमागरम चटणीबरोबर सर्व्ह करा.