शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

शिंगाड्याच्या पीठाचे लाडू

साहित्य : शिंगाडा पीठ १ वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, साजूक तूप ७-८ चमचे, पीठीसाखर पाऊण वाटी
 
कृती : कढईत शिंगाडा पीठ व साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळणे. कोमट असताना लाडू वळणे. 
 
भाजत असतानाच साजूक तूप थोडे थोडे घालणे, म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले की नाही ते कळेल. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.