testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गतविजेत्या जर्मनीचे आव्हान संपुष्टात

कझान| Last Modified गुरूवार, 28 जून 2018 (10:50 IST)
दक्षिण कोरियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला 2-0 असा परभवाचा धक्का दिला. या विजयाने कोरियाच्या हाती काही लागले नाही. परंतु पराभवाने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. विश्र्वचषक इतिहासात प्रथच जर्मनीवर ही नामुष्की ओढावली आहे.
विश्र्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या लढतीत जर्मनीचा संघ प्रचंड दबावाखाली खेळला. स्वीडनविरुद्धच्या विजयी संघातील 5 खेळाडूंना बसवण्याचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. पण त्याचा फार फरक त्यांच्या खेळावर झाला नाही. दक्षिण कोरियाने गतविजेत्यांना जखडून ठेवले. आक्रमक सुरुवात करताना कोरियन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. जर्मनीला पहिल्या सत्रात सामना गोलशून्य राखता आला. यंदाच्या विश्र्वचषक स्पर्धेत जर्मनीला एकदाही पहिल्या सत्रात आघाडी मिळवता आलेली नाही. याआधी 1986 च्या स्पर्धेत त्यांना हे अपयश आले होते. पहिल्या 45 मिनिटांत कोरियाचा खेळ वरचढ ठरला.
मध्यंतरानंतर जर्मनीने थॉमस म्युलर आणि मारियो गोमेझला पाचारण करताना कोरियावर दडपण वाढवण्याची रणनीती आखली, परंतु त्यांच्याही वाट्याला अपयश आले. 47 व्या मिनिटाला गोरेत्झकाचा हेडरवरील प्रयत्न कोरियाचा गोलरक्षक जो ह्योनवूने सुरेखरीत्या अडवला. त्यामुळे जर्मनीच्या खेळाडूंवरील दडपण अधिक वाढले. गोल करण्याच्या सोप्या संधीही त्यांना हेरता आल्या नाहीत. याउलट कोरियन खेळाडूंनी आत्विश्र्वासाने खेळ केला. 80 व्या मिनिटापर्यंत जर्मनीने गोल करण्याचे 15 प्रयत्न केले.
त्यातील चारच प्रयत्न लक्ष्यावर होते आणि कोरियाच्या गोलरक्षकाने ते प्रयत्न योग्यरितीने रोखले. अखेरच्या दहा मिनिटांत गोलप्रयत्नांचा सपाटा अधिक वेगाने वाढला, परंतु पुन्हा एकदा ह्योनवूची बचावभिंत ओलांडण्यात ते अपयशी ठरले.

भरपाईवेळेत कोरियाच्या किम यंगवूनच्या गोलने जर्मनीच्या आपेक्षांना सुरुंग लावला. मैदानावरील पंचाने हा गोल ऑफसाइड ठरवला. मात्र व्हिडिओ असिस्टंटपंचानी तो गोल वैध ठरवला. त्यात भर टाकत सन ह्युगीने आणखी एक गोल करून जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळवला.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

national news
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. ...

सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार बंद

national news
बँक कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल ...

नेपाळ : भारताच्या फक्त १०० च्या नोटा चालतील

national news
नेपाळमध्ये आता भारतीय चलनातल्या 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटा चालणार नसल्याची घोषणा ...

आजीने केला विक्रम, १०२ वर्षी केले स्कायडायव्हींग

national news
ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये राहणाऱ्या इरेना ओशिया या 102 वर्षांच्या आजीने तब्बल 14 हजार ...

भाजपचा आता परिषदांवर अधिक भर

national news
लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजपकडून येत्या ११ व १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषद बोलवली ...