testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार?

fifa france
कझान| Last Modified बुधवार, 13 जून 2018 (14:35 IST)
रशियात खेळल्या जाणार्‍या 21व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत डार्क हॉर्स मानला जाणारा फ्रान्सचा संघ या स्पर्धेत नवा इतिहास रचणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
फ्रान्सचा संघ येथे येऊन दाखल झाला आहे. फ्रान्स क गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क असे चार संघ आहेत. फ्रान्साला सोपा ड्रॉ ठरेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार आहे. चार संघातून गुणानुक्रमे पहिले दोन संघ पुढच्या बाद फेरीस पात्र ठरणार आहेत. साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ स्पर्धेत पुढे जाऊ शकतो. 16 जून रोजी फ्रान्स ऑस्ट्रेलिाविरुध्दच्या सामन्याने विश्वचषक मोहिेमेस प्रारंभ करणार आहे.
फ्रान्सचा संघ हा सर्वात प्रतिभावान असावा. त्याचे कारण म्हणजे संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे सुंदर मिश्रण आहे. दुसरे कारण म्हणजे या संघात स्वतःच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.

या वर्षाच्या संघात 1998 सालच्या दिदिएर देशचॅम्पस याच्या संघाची झलक पाहायला मिळते. 1998 साली फ्रान्सने विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वजेत्या संघात देशचॅम्पस, झिनेदिन झिदाने, एमान्युएल पेटिट, मार्सेल डेसेली, लिलियन थुराम, फॅबियन बार्थेस असे दमदार व दिग्गज खेळाडू होते. फ्रान्सची त्यावेळची राखीव फळीही मजबूत अशीच होती.
यावेळच्या संघात पॉल पोग्बा, अन्यएन ग्रिएझमन, कायलियन एबाणे, एन्गोलेकान्ते, उस्मान डेम्बेले, ह्यूगो लोरिस, सॅम्युएल उमनिनीसारखे एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. याच खेळाडूंच्या जोरावर फ्रान्सचा संघ 20 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला आहे.

ग्रिएझन, एमबाणे, जिकऊ, थॉमस लेचार या खेळाडूंवर फ्रान्सच्या आक्रमणाची जबाबदारी आहे. स्पेनच्या अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून खेळणारा ग्रिएझमनने मागील मोसमात 49 सामन्यात 29 गोल केले होते. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणारा एमबाणे हा पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. 19 वर्षाचा एमबाणे हा फॉर्मात आहे. गेल्या मोसमात त्याने 44 सामन्यांमध्ये 21 गोल केले आहेत. ग्रिएझमन आणि एमबाणेला ऑलिव्हिएर जिरूड आणि थॉमस लेमार पर्याय असतील. या दोघांनी व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटविला आहे.
पॉल पोग्बा, एन्गोलो कान्ते, उस्मान डेम्बेले या खेळाडूंवर आघाडीच्या फळीचे काम सोपविण्यात आले. 2014 सालचा विश्वचषक खेळण्याचा अनुभव पोग्बाच्या पाठीशी आहे. पोग्बामध्ये स्वतः गोल करण्याची
आणि इतर खेळाडूंना गोल करण्यास मदत करण्याची क्षमता आहे. पोग्बाने मागील मोसमात मँचेस्टर युनायटेडकडून समाधानकारक कामगिरी केली आहे. 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीत पोग्बाने नेदरलँडस आणि स्वीडनविरुध्द गोल केले आहेत.
फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्यूगो लोरिस याला 98 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. ह्यूगोने 2010 आणि 2014 साली दोन विश्वचषकात फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्रान्सने 14 वेळा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. 1998 साली फिफा विश्वचषक फ्रान्सने जिंकला होता तर 2006 साली फ्रान्सने उपविजेतेपद मिळविले होते. 2014 साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात फ्रान्सचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपले.
प्रशिक्षक देशचॅम्प्स यांना एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून 33 वर्षाचा अनुभव आहे. फुटबॉलमधील अनेक चढउतार त्यांनी पाहिले आहेत. 1990 आणि 1994 साली अपात्र ठरलेल फ्रान्सच्या संघाला देशचॅम्पस यांनी 1998 साली विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. प्रशिक्षक म्हणून 17 वर्षाचा त्यांना अनुभव आहे.यावर अधिक वाचा :

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

national news
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक ...

Instagram ने लाँच केली नवीन सेवा, झाले 1 अरब यूजर्स

national news
बुधवारचा दिवस इंस्टाग्रामसाठी ऐतिहासिक ठरला. या सोशल साईटच्या यूजर्सची संख्या बुधवारी एक ...

या फोनची किंमत आहे 22,999 रुपये, मिळू शकतो फक्त 6,999 ...

national news
Motorolaच्या Moto X4 फोनवर Flipkart सेलमध्ये डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट फार जास्त ...

मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

national news
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...