बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

गुजराती गोटे

साहित्य : दोन वाट्या चण्याचे जाडसर पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, मेथीची एक जुडी, दोन चमचे धने, एक चमचा जिरे, एक चमचा अर्धवट कुटलेले धने, एक चमचा मिरे, चिमूटभर पापडखार, अर्धा चमचा साखर, तिखट, मीठ, दोन चमचे आंबट ताक, तेल.
 
कृती : चण्याचे पीठ व रवा एकत्र मिसळून, त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर, ताक, पापडखार, धने व जिरे भाजून त्यांची पूड, अर्धवट कुटलेले धने, अर्धवट कुटलेले मिरे व मोहनाकरिता तीन चमचे कडकडीत तेल असे साहित्य घालावे. मेथीची भाजी चिरून घालावी व पाणी किंवा दूध घालून पीठ भिजवावे. नेहमीच्या भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट भिजवावे. नंतर तेल तापवून त्यात वरील पिठाचे हाताने गोळे करून, टाकून गोटे तयार करावेत.