1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

पालकाची कोरडी भाजी

WD
साहित्य- पालक, कांदा, मिरची, दाण्याचा कूट, मीठ- फोडणी साहित्य (चवीनुसार).

कृती- पाव किलो पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरावेत. नेहमीप्रमाणे फोडणी करावी. नंतर त्यात बारीच चिरलेला कांदा टाकावा. एक वाफ घ्यावी. मग चिरलेला पालक त्यात घालावा व परतावा. एक वाफ आल्यावर दाण्याचा कूट त्यात घालावा. तिखट-मीठ चवीनुसार वापरावे. हिरव्या मिरचीचे तुकडे घातल्यास तिखट घालू नये.