1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

शाही थालीपीठ

ND
भाजणी पीठ धान्यांचे प्रमाण ज्वारी १ किलो,बाजरी १/२ किलो,मुग डाळ २५० ग्रॅम,उडीदडाळ २५० ग्रॅम, चणाडाळ २५० ग्रॅम, अख्खी चवळी २५० ग्रॅम, मटकी२५० ग्रॅम, तांदुळ २५० ग्रॅम, गहु २५० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २५० ग्रॅम. धणे १०० ग्रॅम. जिरे २५ ग्रॅम. १च.चमचा मीरीचे दाणे. सर्व धान्ये/पदार्थ वेगवेगळे खरपुस भाजुन व एकत्र करुन बारिक दळावेत.

लागणारे पदार्थ ... गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची,लसुण पात किवा ५-६ लसुण पाकळया, कोथिंबीर, पुदिना, आले तुकडा, कांदा, लाल मिरची पुड, हळ्दी पुड, ७-८ बदाम, ७-८ काजु, सफेत तीळ, भाजणीपीठ, पाणी.

कृती:- एक गाजर,एक शिमला मिरची, एक टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या ,४-५ लसुण पाती किवा ५-६ लसुण पाकळया, अर्धी वाटी पुदिना,अर्धा इंच आले तुकडा,१ च.चमचा लाल मिरची पुड,अर्धा च.चमचा हळ्दी पुड, १ च.चमचा धणे जिरे पुड, १च.चमचा ओवा, ७-८ बदाम,७-८ काजु, चविपुरते मीठ ,एक वाटी दही.असल्यास चिमुट्भर केशर.

भाजांचे बारीक तुकडे करुन मिक्सर मध्ये टाकुन प्युरे करावी.त्यात कोथिंबीर व कांदा सोडुन वरिल सर्व जिन्नस मिसळून पेस्ट करावि व ती एका पातेल्यात किवा बाउल मध्ये ओतावी.त्यात बसेल तेवडे भाजणीचे पीठ कालवुन थोडेसे पाणी ओतुन पातळ्सर मळावे. मळवलेल्या पीठात वाटीभर बारीक चिरलेलि कोथिंबीर , एक बारिक चिरलेला कांदा व एक चमचा गोडे तेल टाकून पीठ चांगले मळुन घ्यावे. लगेच ओल्या फडक्यावर गोल आकारात थालीपीठ थापुन त्यावार चिमुटभर पांढरे तीळ शिंपडुन थालीपीठाला मध्यावर व बाजुला बोटाने ५-६ आरपार छिद्र करुन तापलेल्या जाड तव्यावर टाकावे व छिद्रांमधे थेंब थेंब तुप टाकुन व झाकण ठेउन थालीपीठ दोन्ही बाजुने खरपुस भाजावे.

टोमॅटो सॉस किवा दह्याबरोबर गरमागरम शाही थालीपीठ खावे.