Widgets Magazine

कोजागरी व्रताचे महत्त्व

kojagiri purnima
आश्विन पौर्णिमेला ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी. उपवास करावा. गंधपुष्पादींनी पूजिलेले व तुपाचे एक लक्ष, पन्नास हजार, दहा हजार, एक हजार किंवा शंभर दीप लावून देवमंदिर, बाग-उद्याने, तुसलीवृंदावन अश्वत्थवृक्ष, वस्तीतील रस्ते, चौक, गल्ला, घराची छते इ. ठिकाणी ठेवावे.
उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी. ब्राह्मनांना घृतशर्करामिश्रित खीर वाढावी. वस्त्रे, दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीप दान करावे. असे केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते. या दिवशी रात्री इंद्र आणि लक्ष्मी विचारीत असतात, ' कोण जागे आहे'? उत्तरादाखल त्यांचे पूजन आण दीपप्रज्वलन पाहिले म्हणजे त्या देवता प्रसन्न होतात आण हे व्रत करणारास लक्ष्मी आणि प्रभुत्व प्राप्त होते.


यावर अधिक वाचा :