बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (13:01 IST)

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, जाणून घ्या रोचक कथा

केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीरामाला गंगेच्या पलीकडे सोडले होते. केवट यांनी प्रथम प्रभू श्रीरामाचे चरण धुतले आणि नंतर त्यांना आपल्या नावेत बसवले. पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वजन्मी कासव होते आणि श्रीहरीचे भक्त होते. मोक्षप्राप्ती हेतू त्यांनी क्षीरसागरात प्रभू विष्णूंचे चरण स्पर्श करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला तरी अयशस्वी ठरले. अनेक जन्म हेच सुरू असताना त्यांनी मात्र प्रभूंना ओळखण्याची दिव्य दृष्टी प्राप्त केली. त्रेतायुगात याच कासवाने केवटच्या रुपात जन्म घेतला आणि जेव्हा प्रभू श्रीराम वनवास गमन करताना गंगा पार करण्यासाठी काठावर उभे होते तेव्हा केवटने त्यांना ओळखले.
 
केवटांचे वर्णन रामायणाच्या अयोध्या कांडमध्ये सापडतं. राम केवट यांना आवाज देऊन म्हणतात- नाव काठावर आणावी, गंगा पार करायची आहे.
* मागी नाव न केवटु आना। कहइ तुम्हार मरमु मैं जाना॥
चरन कमल रज कहुं सबु कहई। मानुष करनि मूरि कछु अहई॥
- श्री रामांनी केवटांना नावेत घेऊन चल असे म्हटल्यावर ते म्हणतात- मला जाणीव आहे की आपल्या पायांच्या धुळीने कोणतीही वस्तू मानव रूप धारण करते म्हणून आधी आपले पाय धुवून आणि मगच आपल्या नावेत बसवेन. 
 
* छुअत सिला भइ नारि सुहाई। पाहन तें न काठ कठिनाई॥
तरनिउ मुनि घरिनी होइ जाई। बाट परइ मोरि नाव उड़ाई॥
भावार्थ:- ज्याच्या मात्र स्पर्श केल्याने दगड देखील सुंदरी स्त्रीच्या रुपात परिवर्तित झालं (मग माझी नाव तर लाकडाची आहे). लाकूड तर दगडापेक्षा कठोर नाही आणि अशात माझी नाव देखील स्त्री रुपात परिवर्तित झाली तर मी काय करेन. (अर्थात यावर तर माझी उपजीविका चालते मग मी काय कमावेन आणि काय खाईन) म्हणून मी आधी आपले चरण धुणार आणि चरणामृत पिऊन बघेन, मी सुखरूप राहिलो तर आपल्याला गंगा पार करवेन.